Aaj Zala Shwas Mokla

आज जाहला श्वास मोकळा
आज जाहला श्वास मोकळा
कोष व्यथांचे तुटले

पंख जिन्याला फुटले, कोष व्यथांचे तुटले
पंख जिन्याला फुटले, कोष व्यथांचे तुटले

मीच गाऊनी मजसी रमविन
काडी-काडी कणकण जमविन

उभारीन ते घरकुल ज्याला
उभारीन ते घरकुल ज्याला
दैवी विस्कटले

पंख जिन्याला फुटले, कोष व्यथांचे तुटले
पंख जिन्याला फुटले, कोष व्यथांचे तुटले

थकल्या तोंडी घालीन चारा
क्षिणल्या शरीरा ऊब निवारा

जगविन सारे जीव प्रीतीचे
जगविन सारे जीव प्रीतीचे
जीवा जे विटले

पंख जिन्याला फुटले, कोष व्यथांचे तुटले
पंख जिन्याला फुटले, कोष व्यथांचे तुटले

तुटल्या आशा पुन्हा चांदवीन
हलत्या फांदीवरी नांदवीन

घर दुबळ्यांचे दिसेल जगता
घर दुबळ्यांचे दिसेल जगता
आनंदे नटले

पंख जिन्याला फुटले, कोष व्यथांचे तुटले
पंख जिन्याला फुटले, कोष व्यथांचे तुटले

आज जाहला श्वास मोकळा
आज जाहला श्वास मोकळा
आज जाहला श्वास मोकळा
आज जाहला श्वास मोकळा



Credits
Writer(s): Ram Kadam, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link