Lavato

लवतो डोळा...
लवतो डोळा आज कशानं?
फडफडते पापणी, फडफडते पापणी
घरी परतूनी येतील का धनी?
सांग सखे, साजणी?

(सांग सखे, साजणी?)
(सांग सखे, साजणी? सांग, सांग, सांग)

वर्षा मागून...
वर्षा मागून गेली वर्ष, वाट बघत थांबले
वर्षा मागून गेली वर्ष, वाट बघत थांबले
पुन्हा घडावी भेट म्हणूनी का औक्ष असे लाभले
(औक्ष असे लाभले, औक्ष असे लाभले)

कावकाव करी का हा कावळा लिंबावर अंगणी?
कावकाव करी का हा कावळा लिंबावर अंगणी?

घरी परतूनी येतील का धनी?
सांग सखे, साजणी?
(सांग सखे, साजणी?)
(सांग सखे, साजणी? सांग, सांग, सांग)

(सांग सखे, साजणी?)
(सांग सखे, साजणी? सांग, सांग, सांग)

पुरुष जातीला इमान नाही
पुरुष जातीला इमान नाही
मतलब तितुका कळे
(मतलब तितुका कळे, मतलब तितुका कळे)

घेतो शोषून करीत भुंगा पुन्हा न तिकडे वळे
(पुन्हा न तिकडे वळे)
जनावरापरी यास कान्हा, बांधावे दावनी
जनावरापरी यास कान्हा, बांधावे दावनी

घरी परतूनी येतील का धनी?
सांग सखे, साजणी?
(सांग सखे, साजणी?)
(सांग सखे, साजणी? सांग, सांग, सांग)

(सांग सखे, साजणी?)
(सांग सखे, साजणी? सांग, सांग, सांग)

का एकांती राहू बाई, ५६ फिरती मागे
(५६ फिरती मागे, अहो, ५६ फिरती मागे)
तुटले नाते जळून गेले सगळे रेशीम धागे
(सगळे रेशीम धागे)

म्हणत आठवतीन का मजला
फाजील समजो कुणी, फाजील समजो कुणी
(सांग सखे, साजणी?)
(सांग सखे, साजणी? सांग, सांग, सांग)

(सांग सखे, साजणी?)
(सांग सखे, साजणी? सांग, सांग, सांग)
(सांग सखे, साजणी?)
(सांग सखे, साजणी? सांग, सांग, सांग)



Credits
Writer(s): Yashwant Deo, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link