Shravan Mahina

टक्क लावूनी ओ बघतोया आईना
टक्क लावूनी ओ बघतोया आईना
औंदा निराळा आलाया
औंदा निराळा आलाया
श्रावण महिना, श्रावण महिना
टक्क लावूनी ओ बघतोया आईना

पदर मला झालाया जड
सरला उतार आलाया चढ

फुल टोचती पायाला
वाट ही मोठी बाई अवघड
फुल टोचती पायाला
वाट ही मोठी बाई अवघड

दिस जातोय रातच आता
दिस जातोय रातच आता
जाता जाईना, जाता जाईना
टक्क लावूनी ओ बघतोया आईना

केस गुलाबी, ओठाला छळे
कस रानला गुपित कळे?

काय बोललं फुलपाखरू?
झालं शिवार मधाचे मळे
काय बोललं फुलपाखरू?
झालं शिवार मधाचे मळे

झूला देहाचा हवेत माझा
झूला देहाचा हवेत माझा
राहता राहीना, राहता राहीना
टक्क लावूनी ओ बघतोया आईना

घुटमळतो का पाय पायाशी?
काळजात माझ्या होई धडधड

गाते कोकिळा गाण कुणाच?
कोण्या राजाचं आहे ह्यो गड?
गाते कोकिळा गाण कुणाच?
कोण्या राजाचं आहे ह्यो गड?

टाप घोड्याची कानावरती
टाप घोड्याची कानावरती
येता येईना, येता येईना
टक्क लावूनी ओ बघतोया आईना



Credits
Writer(s): Pawar Vinayak, Abhiraj Harsshit
Lyrics powered by www.musixmatch.com

Link