Houn Jau Dya

ही दुनिया रंग रंगीली, स्वप्नांनी भरलेली
बघताना-जगताना, काय झालं सांग ना?
वाऱ्या वरती उडताना, तारे हाती धरताना
ही जादू घडताना, काय झालं ऐक ना?

मी पंख पसरले भान विसरले झाले सतरंगी
मी आज नव्याने मला भेटले झाले मनरंगी

वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या

सारे नवे-नवे, वाटे हवे-हवे
तरी ही दुवे जोडले मी जुणे
थोडे-थोडे हसू, थोडे-थोडे रुसू
तरी ही पुन्हा जिंकली तू मने

हो, मी पंख पसरले भान विसरले झाले सतरंगी
मी आज नव्याने मला भेटले झाले मनरंगी

वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या

मायेचा ओलावा, प्रेमाचा गोडवा
जगावेगळे वेड आहे किती?
वाटेवरी जरी, काटे किती तरी
तुला फ़िकर ना, कशाची भीती?

मी पंख पसरले भान विसरले झाले सतरंगी
मी आज नव्याने मला भेटले झाले मनरंगी

अरे, वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या

वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या

Credits
Writer(s): Mandar Cholkar, Rohan Rohan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link