Dis Jatil Dis Yetil

तुझ्या-माझ्या संसाराला आणि काय हवं?
तुझ्या-माझ्या लेकराला घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नविन घडंल
घरकुलासंग समद येगळं होईल

दिस जातील, दिस येतील
भोग सरलं, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरलं, सुख येईल

अवकळा समदी जाईल निघूनी
तरारलं बीज तुझं माझ्या कुशीतूनी
मिळलं का त्याला उन-वारा-पानी?
राहिलं का सुकलं ते तुझ्या-माझ्या वानी?

रोप आपुलचं पर होईल येगळं
रोप आपुलचं पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं

दिस जातील, दिस येतील
भोग सरलं, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरलं, सुख येईल

ढगावानी बरसलं त्यो, वाऱ्यावानी हसवलं त्यो
ढगावानी बरसलं त्यो, वाऱ्यावानी हसवलं त्यो
फुलावानी सुखविल, काट्यालाबी खेळविल
समद्या दुनियेचं मन रिझविल त्यो

असलं त्यो कुणावानी?
असलं त्यो कुणावानी, कसा गं दिसलं?
तुझ्या-माझ्या जीवाचा तो आरसा असलं

दिस जातील, दिस येतील
भोग सरलं, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरलं, सुख येईल

उडूनिया जाईल ही आसवांची रात
आपुल्याचसाठी उद्या फुटलं पहाट
आपुल्याचसाठी उद्या फुटलं पहाट
पहाटच्या दवावानी तान्हं तुजं-माजं

सोसंल गं कसं त्याला जीवापाड ओझं?
सोसंल गं कसं त्याला जीवापाड ओझं?

इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव

दिस जातील, दिस येतील
भोग सरलं, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरलं, सुख येईल

दिस जातील, दिस येतील
भोग सरलं, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरलं...



Credits
Writer(s): Moghe Sudhir, Phadke V
Lyrics powered by www.musixmatch.com

Link