Asel Kothe Rutala Kanta

असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायात?
लाडी-गोडीनं तुम्ही फिरवता पाठीवरती हात
याचा बोभाट होईल उद्या
मला लवकर घराकडं जाऊ द्या

अहो, ओ सजना, दूर व्हा, दूर व्हा ना
जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या
सजना, दूर व्हा, दूर व्हा ना
जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या

अर्ध्या वाटेत काटा मला लागला
कसे कोठून तुम्ही इथं थांबला

आहे तस्साचं काटा तिथं राहू द्या
आहे तस्साचं काटा तिथं राहू द्या
मला लंगडत घराकडं जाऊ द्या

अहो, ओ सजना, दूर व्हा, दूर व्हा ना
जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या
सजना, दूर व्हा, दूर व्हा ना
जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या

तिन्ही सांजची वेड अशी वाकडी
इथं शेजारी नणदीची झोपडी

आहे तस्सचं येणं-जाणं राहू द्या
आहे तस्सचं येणं-जाणं राहू द्या
आता अब्रूनं घराकडे जाऊ द्या

अहो, ओ सजना, दूर व्हा, दूर व्हा ना
जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link