Nighale Asatil Rajkumar

निघाले-निघाले असतील राजकुमार
निघाले असतील राजकुमार
पथ मिथिलेचे असतील चुंबित
कमळदळे हळुवार

निघाले, निघाले असतील राजकुमार
निघाले असतील राजकुमार

कुठे पहाटे तृणांकुरावर
कुठे पहाटे तृणांकुरावर
धुके पसरले असेल सुंदर

हिम रंगावर निळी पाऊले
उमटवीत सुकुमार
निघाले, निघाले असतील राजकुमार
निघाले असतील राजकुमार

कुठे तरुतळी सायंकाळी
कुठे तरुतळी सायंकाळी
विसावेल ती मूर्त सावळी

तरुशाखांनी असेल केला
तारासम झंकार
निघाले, निघाले असतील राजकुमार
निघाले असतील राजकुमार

अंग थरथरे, लवती लोचन
अंग थरथरे, लवती लोचन
समीप असतील श्री रघुनंदन
समीप असतील श्री रघुनंदन

आज स्मराने हळू उघडिले
आर्त मनाचे द्वार
निघाले, निघाले असतील राजकुमार
निघाले असतील राजकुमार



Credits
Writer(s): Vasant Shantaram Desai, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link