Tu Nasata Majsange Vedana Manachi

तू नसता मजसंगे
तू नसता मजसंगे वाट ही उन्हाची
संगतीस एकाकी
संगतीस एकाकी वेदना मनाची
तू नसता मजसंगे
तू नसता

मादक तो पुष्पराग
मादक तो पुष्पराग, श्वास ते सुगंधी
ओझरते स्पर्श खुळे, ती नवखी धुंदी
विरहाची दीर्घ युगे, मीलने क्षणाची
वेदना मनाची
तू नसता मजसंगे
तू नसता

क्षण यावे जवळ जरा
क्षण यावे जवळ जरा
क्षण यावे जवळ जरा, फिरून दूर जावे
अर्ध्यावर तुटून सूर गीत ओघळावे
देव म्हणू, दैव म्हणू, योजना कुणाची?
वेदना मनाची
तू नसता मजसंगे

तू नसता मजसंगे वाट ही उन्हाची
संगतीस एकाकी
संगतीस एकाकी वेदना मनाची
तू नसता



Credits
Writer(s): Meena Khadikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link