Bala Jo Jo Re

बाळा, जो-जो रे
बाळा, जो-जो रे
पापणीच्या पंखांत झोपू दे
डोळ्यांची पाखरे

बाळा, जो-जो रे
बाळा, जो-जो रे

झोपी गेल्या चिमण्या-राघू
झोपी गेल्या चिमण्या-राघू
चिमण्या राजा, नकोस जागू
चिमण्या राजा, नकोस जागू

हिरव्या पानावरी झोपली
वैलींची लेकरे
बाळा, जो-जो रे
बाळा, जो-जो रे

पुरे खेळणे आता बाळा
पुरे खेळणे आता बाळा
थांबव चाळा, थांबव वाळा
थांबव चाळा, थांबव वाळा

वनदेवींनी उघडी केली
स्वप्नांची मंदिरे
बाळा, जो-जो रे
बाळा, जो-जो रे

मेघ पांढरे उशास घेऊनी
मेघ पांढरे उशास घेऊनी
चंद्र-तारका निजल्या गगनी
चंद्र-तारका निजल्या गगनी

शब्द ऐकते झोपेमधुनी
चावळते वारे
बाळा, जो-जो रे
बाळा, जो-जो रे



Credits
Writer(s): Vasant Pawar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link