Toch Chandrama Nabhant, Pt. 1

तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तुही कामिनी
तीच तुही कामिनी

तोच चंद्रमा नभात...

निरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखीयले चित्र तेच देखणे
जाई का कुंज तोच तीच गंधमोहिनी
एकांती मजसमीप तीच तुही कामिनी
तीच तुही कामिनी

तोच चंद्रमा नभात...

सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे?
मी ही तोच, तीच तुही, प्रीती आज ती कुठे?
तीन आर्थता उरात, स्वप्न ते न लोचनी
एकांती मजसमीप तीच तुही कामिनी
तीच तुही कामिनी

तोच चंद्रमा नभात...

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरातुनी
एकांती मजसमीप तीच तुही कामिनी
तीच तुही कामिनी

तोच चंद्रमा नभात...



Credits
Writer(s): Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link