Visarsheel Khas Mala

रसिकहो, Asha Bhosle यांनी गाऊन
लीकप्रीय केलेल्या गीताचा इतिहास
मोठा मनोरंजक आहे

सन १९५४-५५ चा सुमार असावा
HMV सारख्या recording कंपनीने
आपली गाणी record करावीत म्हणून
HMV च्या ऑफिसात वरचेवर खेटे घालणाऱ्या
अनेक धडपड्या संगीतकारामध्ये मी ही एक होतोच की

"विसरशील खास मला" या माझ्या गाण्याची चाल
त्यावेळी तिथल्या अधिकाऱ्यांनी नापसंद केली होती
म्हणाले "dull आहे, जरा bright चाल काढा ना"

मी काहीच न बोलता निघून गेलो
१९५५ साली मी आकाशवाणीच्या सेवेत रुजू झालो होतो
तिथे हे गीत Sudha Malohtra यांना शिकवलं
आणि तिथून ते ध्वनिक्षेपित हि झालं
तेव्हापासून ते गीत अधिक-अधिक लोकप्रिय होत गेलं

आणि त्यानंतर अनेक अनेक पत्र लोकांकडून येत गेली
"या गीताचे record कुठे मिळेल का?"
अशी विचारणा अनेकांकडून वारंवार झाली
या गीतावर Asha Bhosle याचं तर प्रेमच बसलं होतं
आणि शेवटी तेच झालं
HMV नेच त्या गाण्याची record केली ती आशाबाईंच्या स्वरात
मला वाटतं त्या गाण्याचं नशिबच बलवत्तर असाव

बघा ना, एखाद्या मुलीला आपण नापसंद कराव
आणि योगायोगाने तिच्याशीच आपलं लग्न व्हाव
तसच काहीसं घडलं, नाही का?

विसरशील खास मला दृष्टिआड होता
विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोड गोड देशी जरी आता
विसरशील खास मला

दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायही विविध, विविध विषय भोवताली
गुंतता तयात कुठे
गुंतता तयात कुठे, वचन आठवीता
वचन आठवीता
विसरशील खास मला

स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशही वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केवि जसा होता
वचने ही गोड गोड देशी जरी आता
विसरशील खास मला

अंतरिची आग तुला जाणवू कशाने?
अंतरिची आग तुला जाणवू कशाने?
बोलवे न वेदनाच वचन दुःख नेणे
याकरता दृष्टिआड
याकरता दृष्टिआड होऊ नको नाथा
होऊ नको नाथा
वचने ही गोड गोड देशी जरी आता
विसरशील खास मला



Credits
Writer(s): Yashwant Deo, J K Upadhye
Lyrics powered by www.musixmatch.com

Link