Maze Jeevan Gaane

माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे!
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमीर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे,
गात पुढे मज जाणे!

कधी ऐकतो गीत झऱ्यातुन
वंशवनाच्या कधी मनातुन
कधि वाऱ्यातुन, कधि ताऱ्यांतुन
झुळझुळतात तराणे!

तो लीलाघन सत्य चिरंतन
फुलापरी उमले गीतातुन
स्वरास्वरातुन आनंदाचे
नित्य नवे नजराणे!

गा विहगांनो माझ्यासंगे
सुरांवरी हा जीव तरंगे
तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन
उसळे प्रेम दिवाणे!



Credits
Writer(s): Mangesh Padgaokar, P L Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link