Kevhatari Pahate Ultoon Raat Geli

केव्हातरी पहाटे...
केव्हातरी पहाटे उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे...
मिटले चुकून डोळे हरवून रात गेली
मिटले, मिटले, मिटले चुकून डोळे

सांगू तरी कसे मी? वय कोवळे उन्हाचे
...वय कोवळे उन्हाचे
सांगू तरी कसे मी? वय कोवळे उन्हाचे
...वय कोवळे उन्हाचे

उसवून श्वास माझा...
उसवून श्वास माझा फसवून रात गेली
उसवून श्वास माझा...

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी

कळले मला न केव्हा निसटून रात गेली
कळले, कळले, कळले मला न केव्हा...

उरले उरात काही आवाज चांदण्याचे
उरले उरात काही आवाज चांदण्याचे

आकाश तारकांचे उचलून रात गेली
आकाश तारकांचे उचलून रात गेली
आकाश तारकांचे...

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती

मग ओळ शेवटाची...
मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली
केव्हातरी पहाटे उलटून रात गेली
केव्हातरी पहाटे...



Credits
Writer(s): Suresh Bhat, Pt Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link