Mala Ek Chanas Hava

लपवू नका, छपवू नका
धरलंया हातात काय दावा?
की माझ्या लाडक्या जिवा, पिरतीचा ठेवा
रानातनं आणलाय रानमेवा

जरा मला दावा, आधी मला एक चानस हवा
देतो रानमेवा, पर मला एक चानस हवा
देतो रानमेवा, अगं मला एक चानस हवा

लिंबाच्या गारव्याला जाऊया
अन हळूहळू रानमेवा खाऊया
हे, लिंबाच्या गारव्याला जाऊया
अन हळूहळू रानमेवा खाऊया

अरे, नको बाबा, कोणीतरी पाहिल
थांबा जरा झाडाच्या आडाला राहूया
चल केळीच्या फडात, घेईन मी पुढ्यात
झोंबू नका अंगाला दूर जावा, जरा दूर जावा

पर मला एक चानस हवा, जरा दूर जावा
आधी मला एक चानस हवा, जरा दूर जावा
अगं मला एक चानस हवा

नदीच्या किनारी बसूया
मनातल्या मनात हसुया
हे, नदीच्या किनारी बसूया
अन मनातल्या मनात हसुया

पाण्यातली मासळी बघलं मला
चला बांबूच्या बेटात घुसूया
झालो मी राजी अन होशील का माझी?
येऊ नका घाईला दम खावा, जरा दम खावा

आधी मला एक चानस हवा, जरा दम खावा
पर मला एक चानस हवा, जरा दम खावा
अगं, मला एक चानस ह-ह-ह-हवा

मऊमऊ गवतावर झोपुया
अन पिरतीचा गुलकंद चाखूया
हे, मऊमऊ गवतावर झोपुया
अन पिरतीचा गुलकंद चाखूया

असं नका वागू तुम्ही जणांमध्ये
थोडी मनाची लाज तरी राखुया
अगं, पुरे ही तऱ्हा अन जातो मी घरा
थांबा नका जाऊ नामदेवा, माझ्या नामदेवा

मग मला एक चानस हवा, नको नामदेवा
अगं, थोडासा चानस हवा, ओरे नामदेवा
मला एवढाच चानस हवा, देते नामदेवा
Hmm, आता सगळाच चानस हवा, घ्या हो नामदेवा

आता सगळाच चानस हवा, घ्या हो नामदेवा
आता सगळाच चानस हवा...



Credits
Writer(s): Raam Laxman, Dada Kondke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link