Nabh Utaru Aala

हो, नभं उतरु आलं, चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
हो, नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात

हो, नभं उतरु आलं

अशा वलंस राती, गळा शपथा येती
अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जन्माची प्रीती

अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जन्माची प्रीती, सरंल दिन-रात, सरंल दिन-रात

हो, नभं उतरु आलं, चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
हो, नभं उतरु आलं

वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रितभात, सोडून रितभात

हो, नभं उतरु आलं, चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
हो, नभं उतरु आलं

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू तुझ्याच पदरा, तुझ्याच पदरा

हो, नभं उतरु आलं, चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
हो, नभं उतरु आलं, चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, N D Mahanor
Lyrics powered by www.musixmatch.com

Link