Aaj Kuni Tari Yaave

माझं लग्न २९ मे १९४९ साली झालं
माझी पत्नी ती यापूर्वीच अतिशय लोकप्रिय
पार्श्वगायिका म्हणून प्रख्यात होती
"ललिता देऊळकर" तिचं लग्नापूर्वीचं नाव

शेकडो हिंदी चित्रपट यांच्यामध्ये ती गायलेली आहे
आणि तिची शेकडो गाणे अतिशय लोकप्रिय झालेली आहेत
माझं लग्न व्हायच्या वेळेला तिनं आपणहून मला असं म्हटलं की
"मी जर लग्न झाल्यानंतर नाही गायले तर चालेल का?"

मी म्हटलं, "तुझ्या इच्छेप्रमाणे तू काहीही केलेस तरी मला आवडेल"
गायलेस तरी फार चांगलं, समजा तुला गायचं नसलं
तरी काही हरकत नाही

आज कुणीतरी यावे
आज कुणीतरी यावे
ओळखीचे व्हावे
आज कुणीतरी यावे

जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर
जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर

तसे तयाने गावे
तसे तयाने गावे
आज कुणीतरी यावे
आज कुणीतरी यावे

विचारल्याविन हेतू कळावा
त्याचा-माझा स्नेह जुळावा
विचारल्याविन हेतू कळावा
त्याचा-माझा स्नेह जुळावा

हाती हात धरावे
हाती हात धरावे
आज कुणीतरी यावे
आज कुणीतरी यावे

सोडुनिया घर, नाती-गोती
सोडुनिया घर, नाती-गोती
निघून जावे तया संगती
सोडुनिया घर, नाती-गोती
निघून जावे तया संगती

कुठे तेही ना ठावे
कुठे तेही ना ठावे
आज कुणीतरी यावे



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link