Maj Nakot Ashru

मज नकोत अश्रू, घाम हवा
घाम हवा, मज घाम हवा

मज नकोत अश्रू, घाम हवा
घाम हवा, घाम हवा
हा नव्या युगाचा मंत्र नवा
मंत्र नवा, मंत्र नवा

हा नव्या युगाचा मंत्र नवा
मंत्र नवा, मंत्र नवा
मज नकोत अश्रू, घाम हवा
घाम हवा, घाम हवा

होते तैसी अजुन असे मी
सधन अन्नदा सुवर्णभुमी

खंडतुल्य या माझ्या धामी
का बुभुक्षितांचा रडे थवा?
मज नकोत अश्रू, घाम हवा
घाम हवा, घाम हवा

अपार लक्ष्मी माझ्या पोटी
का फिरसी मग माझ्या पाठी?

एक मूठभर अन्नासाठी
जगतोस तरी का भ्याड जीवा?
मज नकोत अश्रू, घाम हवा
घाम हवा, घाम हवा

काय लाविसी हात कपाळी?
फेकून दे ती दुबळी झोळी

जाळ आळसा पेटव होळी
तू जिंक बलाने पराभवा
मज नकोत अश्रू, घाम हवा
घाम हवा, घाम हवा

मोल श्रमाचे तुला कळू दे
हात मळू दे, घाम गळू दे

सुखासिनता पूर्ण जळू दे
दैन्यास तुझ्या हा एक दवा
मज नकोत अश्रू, घाम हवा
घाम हवा, घाम हवा



Credits
Writer(s): G D Madgulkar, Shehal Bhatkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link