Aata Rahilo Mee

आता राहिलो मी जरासा-जरासा
जरासा, जरासा
आता राहिलो मी जरासा-जरासा
जरासा, जरासा

उरावा जसा मंद अंती उसासा
उसासा, उसासा
आता राहिलो मी जरासा-जरासा
जरासा, जरासा

कसा कोरडा-कोरडा जन्म गेला
कसा कोरडा-कोरडा जन्म गेला

कसा रोज मी पीत गेलो पिपासा
पिपासा, पिपासा
आता राहिलो मी जरासा-जरासा
जरासा, जरासा

कसे ओठ तू बंद केलेस माझे
कसे ओठ तू बंद केलेस माझे

करावा कसा आसवांनी खुलासा?
खुलासा, खुलासा
आता राहिलो मी जरासा-जरासा
जरासा, जरासा

असे हे कसे जीवनाचे दिलासे?
असे हे कसे जीवनाचे दिलासे?

दिलाशांस मी देत आहे दिलासा
दिलासा, दिलासा
आता राहिलो मी जरासा-जरासा
जरासा, जरासा

उरावा जसा मंद अंती उसासा
उसासा, उसासा
आता राहिलो मी जरासा-जरासा
जरासा, जरासा



Credits
Writer(s): Suresh Bhat, Ravi Date
Lyrics powered by www.musixmatch.com

Link