Mee Aaj Phul Zale, Pt. 2

मी आज फूल झाले
मी आज फूल झाले
मी आज फूल झाले

जणू कालच्या कळीला
लावण्यरूप आले
मी आज फूल झाले

सोन्याहुनी सतेज
ही भासते सकाळ
किरणातुनी रवी हा
फेकीत इंद्रजाल

मी बावरी-खुळी गं
या सावलीस भ्याले
मी आज फूल झाले
मी आज फूल झाले

आली कशी कळेना
ओठास आज लाली
स्पर्शून जाय वारा
शब्दांस जाग आली

फुलवून पाकळ्या मी
ओल्या दंवात न्हाले
मी आज फूल झाले
मी आज फूल झाले

मी पाहते मला का?
डोळे भरून आज
लागेल दृष्ट माझी
पदरी लपेल लाज

मी आज यौवनाचा
शृंगारसाज ल्याले
मी आज फूल झाले
मी आज फूल झाले

जणू कालच्या कळीला
लावण्यरूप आले
मी आज फूल झाले



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link