Na Na Na Na Nahi Nahi Ga

ना, ना, ना, ना, ना, ना नाही, नाही, नाही गं
हो, आता पुन्हा मजसी येणे नाही गं

घन भरुन-भरुन झरे गगन वरुन
कुणी साजण दुरुन मज दिसे कि हसे
खुणवी सये बाई गं
ना, ना, ना, ना नाही, नाही, नाही गं
हो, आता पुन्हा मजसी येणे नाही गं

बोलती चुडे किन्न, किन्न, किन्न
कलश जल गाते गं
नुपूर बोले छुन, छुन, छुन
पाऊल पुढे जाते गं

नवल घडे, अहा, हं अहा, हं अहा
हृदय धडधडे कि उडे पदर सये बाई गं
ना, ना, ना, ना, ना, ना नाही, नाही, नाही गं
हो, आता पुन्हा मजसी येणे नाही गं

घन भरुन-भरुन झरे गगन वरुन
कुणी साजण दुरुन मज दिसे कि हसे
खुणवी सये बाई गं
ना, ना, ना, ना नाही, नाही, नाही गं

गहन वन झाले गं शीतल वारा
भिजले तनू सारी गं
झेलून धारा, झेलून धारा
पवन वाजे सन्न, सन्न, सन्न
वेढुन मज घेतो गं

भ्रमर बोले गुण, गुण, गुण
साजण साद देतो गं
नयन झरे, अहा, हं अहा, हं अहा
हा थरथर थरे कि झुरे, आतुर मन बाई गं
ना, ना, ना, ना, ना नाही, नाही, नाही गं
हो, आता पुन्हा मजसी येणे नाही गं

नाही सुचत काम, नाही रुचत धाम
मनमोहन श्याम मज दिसे कि हसे
सजण ठायी-ठायी गं
ना, ना, ना, ना नाही, नाही, नाही गं
हो, आता पुन्हा मजसी येणे नाही गं



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link