Raja Lalkari Ashi De

राजा ललकारी अशी दे
हाक दिली, साद मला दे, ओ-ओ
राजा ललकारी अशी दे
हाक दिली, साद मला दे, ओ-ओ
राजा ललकारी अशी दे

कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटवानी मन भरुन गेलंया
कुंकवाचा माझा धनी बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटवानी मन भरुन गेलंया

ओढ फुलाला वाऱ्याची
तशी खूण इशाऱ्याची

माझ्या सजणाला कळू दे
हाक दिली, साद मला दे, ओ-ओ
राजा ललकारी अशी दे
हाक दिली, साद मला दे, ओ-ओ
राजा ललकारी अशी दे

ओ, सूर भेटला सुराला गाणं आलं तालावर
सूर भेटला सुराला गाणं आलं तालावर
खुळ्या आनंदाचं माझ्या हसू तुझ्या गालावर

भरजरीचा हिरवा शेला पांघरुन नवा
भरजरीचा हिरवा शेला पांघरुन नवा

शिवार हे सारं खुलू दे
हाक दिली, साद मला दे, ओ-ओ
राजा ललकारी अशी दे
हाक दिली, साद मला दे, ओ-ओ
राजा ललकारी अशी दे

थेंब नव्हं हे घामाचं त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा लई मायाळू ही माती
थेंब नव्हं हे घामाचं त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा लई मायाळू ही माती

न्याहारीच्या वखुताला
घडीभर इसाव्याला

सावली ही संग मिळू दे
हाक दिली, साद मला दे, ओ-ओ
राजा ललकारी अशी दे
हाक दिली, साद मला दे, ओ-ओ
राजा ललकारी अशी दे



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Anil Arun
Lyrics powered by www.musixmatch.com

Link