Dolyat Vakun Baghtos

डोळ्यांत वाकुन बघतोस काय?
जाल्यात मासोली गावायची नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय?
जाल्यात मासोली गावायची नाय
जाल्यात मासोली गावायची नाय

सोडून बसलास नजराचा गळ
ढवळून काढलास पाण्याचा तळ
सोडून बसलास नजराचा गळ
ढवळून काढलास पाण्याचा तळ

कसं बी झोक, गळाचं टोक
कसं बी झोक, तुझ्या गळाचं टोक
जिव्हारी माझ्या भिडायचं नाय, नाय, नाय

डोळ्यांत वाकुन बघतोस काय?
जाल्यात मासोली गावायची नाय
हट, जाल्यात मासोली गावायची नाय

रुपेरी पोट, माझं रुपेरी कल्लं
रुपेरी पोट, माझं रुपेरी कल्लं
रुपेरी शेपटीचं मारीन वल्हं

निळी-निळी लाट, पाण्यातली वाट
निळी-निळी लाट, माझी पाण्यातली वाट
माझ्या बिगर तुला ठावीच नाय, नाय, नाय

डोळ्यांत वाकुन बघतोस काय?
जाल्यात मासोली गावायची नाय
जाल्यात मासोली गावायची नाय

सुळकन मारीन पाण्यात बुडी
देखता डोळां देईन मी दडी
सुळकन मारीन पाण्यात बुडी
देखता डोळां देईन मी दडी

कुठवर बसशिल, चेटूक करशिल
कुठवर बसशिल, चेटूक करशिल
मंतर असला चालायचा नाय, नाय, नाय

डोळ्यांत वाकुन बघतोस काय?
जाल्यात मासोली गावायची नाय
हट, जाल्यात मासोली गावायची नाय, नाय, नाय



Credits
Writer(s): Bhaskar Chandavarkar, Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link