Kutha Kutha Jayacha Honeymoonla

अहो, भरल्या बाजारी
धनी मला तुम्ही हेरलं (अस्सं का)
हेरलं, ते हेरलं अन लगीन आपुलं ठरलं
(आता चांगलं झालं की)

लगीन झालं, गोंधळ झाला
आता एक काम हो उरलं
(आता आणिक काय उरलं?)

लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा
बंगलोर, गोवा नि कश्मीरला
लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा
बंगलोर, गोवा नि कश्मीरला

कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?
सांगा कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?
कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?
आता कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?

(ए, लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा)
(बंगलोर, गोवा नि कश्मीरला)
हो, कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?
राया, कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?

रातभर एकली जागू कशी?
सासूला अडचण सांगू कशी?
रातभर एकली जागू कशी?
सासूला अडचण सांगू कशी?

घरात पाव्हणं न् दारात मेव्हणं
एकांत मिळं ना भेटायला
कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?
आता कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?

(ए, लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा)
(बंगलोर, गोवा नि कश्मीरला)
कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?
आता बोला की हो, हनिमूनला?

नऊवारी नेसून कारभारी
खेटून बशीन शेजारी
नऊवारी नेसून कारभारी
खेटून बशीन शेजारी

गरम आंथरूण, गरम पांघरूण
गरमा-गरम ह्यो मामला
कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?
आता कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?

(ए, लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा)
(बंगलोर, गोवा नि कश्मीरला)
हो, कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?
राया, कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?

गुलाबी थंडीत गमतीनं
मजेत राहू या संगतीनं
गुलाबी थंडीत गमतीनं
मजेत राहू या संगतीनं

जातांना दोघं न् येतांना तिघं
नातूच आणूया दावायला
कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?
राया, कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?

(ए, लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा)
(बंगलोर, गोवा नि कश्मीरला)
(ए, लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा)
(बंगलोर, गोवा नि कश्मीरला)

कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?
आता तरी बोला की हो, हनिमूनला?
कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?
राया, कुठं-कुठं जायाचं हनिमूनला?



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Bal Palsule
Lyrics powered by www.musixmatch.com

Link