Sang Tu Majha Hoshil Ka

सांग तू माझा होशिल का?
होशिल का, होशिल का?
माझा होशिल का?

वसंतकाली वनी दिनांती
वसंतकाली वनी दिनांती
एकच पुशिते तुज एकांती
वसंतकाली वनी दिनांती

एकच पुशिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा हाती घेशिल का?

माझा होशिल का?
होशिल का, होशिल का?
माझा होशिल का?

नसेल माहीत तुला कधी ते
नसेल माहीत तुला कधी ते
रोज तुझ्या मी स्वप्नी येते
रोज तुझ्या मी स्वप्नी येते

त्या स्वप्नांच्या आठवणी या ओठां देशिल का?
माझा होशिल का?
होशिल का, होशिल का?
माझा होशिल का?

दूर तू तरी जवळ तुझ्या मी
दूर तू तरी जवळ तुझ्या मी
नांव गुंतवित तुझिया नामी

नांव गुंतवित तुझिया नामी
मी येता पण सलज्ज जवळी, जवळी घेशिल का?

माझा होशिल का?
होशिल का, होशिल का?
माझा होशिल का? सांग तू
माझा होशिल का?



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link