Pakhara Geet Nako Gavoo

पाखरा, गीत नको गाऊ
पाखरा, गीत नको गाऊ

कातरवेळी आतुर जीवा...
कातरवेळी आतुर जीवा वेध नको लावू
गीत नको गाऊ
पाखरा, गीत नको गाऊ

शब्दाहुन तंव सूर बोलके
कानी येता काळीज चरके
शब्दाहुन तंव सूर बोलके
कानी येता काळीज चरके

विरहाचे हे मुके हुंदके...
विरहाचे हे मुके हुंदके सांग कशी साहू?
गीत नको गाऊ
पाखरा, गीत नको गाऊ

रात्रं-दिन जो जवळ असावा
आज कुठे तो प्राणविसावा?
रात्रं-दिन जो जवळ असावा
आज कुठे तो प्राणविसावा?

त्या प्रीतीच्या फसव्या गावा...
त्या प्रीतीच्या फसव्या गावा नको पुन्हा नेऊ
गीत नको गाऊ
पाखरा, गीत नको गाऊ

कातरवेळी आतुर जीवा...
कातरवेळी आतुर जीवा वेध नको लावू
गीत नको गाऊ
पाखरा, गीत नको गाऊ



Credits
Writer(s): Dutta N
Lyrics powered by www.musixmatch.com

Link