Jaan Aahe Aapnasi

जाण आहे आपणांसी, मी कशाला सांगणे?
कठिण झाले प्राणनाथा, एकट्याने राहणे
जाण आहे आपणांसी...

दिवस जातो सहज सरुनी...
दिवस जातो सहज सरुनी, रात्र बसते रोवुनी

पेटती हट्टास डोळे नाव तुमचे घेऊनी
चहू दिशांना एक दिसते रूप उमदे देखणे
कठिण झाले प्राणनाथा, एकट्याने राहणे
जाण आहे आपणांसी...

नेटका संसार माझा...
नेटका संसार माझा, नांदते मी गोकुळी

दुःख आहे एक हे की, राव नाही राउळी
फुलून सुकती भाव माझे ते कुणाला वाहणे?
कठिण झाले प्राणनाथा, एकट्याने राहणे
जाण आहे आपणांसी...



Credits
Writer(s): Vasant Shantaram Desai, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link