Dev Nahi Jevlela

तोच जयाले दिधले, बाळा
घास द्याया विसरलेला
कळूनी येता चूक आपली
देव नाही जेवलेला
कळूनी येता...

अनंतकोटी जीव जीवांचा
पोशिंदा तो प्रभू एकला
सर्वांमुखी तो घास भरविता
असेल क्षिणला, चालून थकला

भूक आमुची...
भूक आमुची मिठी मारता
गहिवरूनी तो व्याकुळलेला
देव नाही जेवलेला
कळूनी येता...

अश्रू ढाळीत येता धावत
सीमेवरती दिन मावळला
चंद्रमोळीधर हे आपुले
अंधारातच शोधीत आला
अंधारातच शोधीत आला

मिटल्या नयनी येईल खचूनी
घास आपला भरवायाला
देव नाही जेवलेला
कळूनी येता...



Credits
Writer(s): P Savalaram, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link