Kunala Sangu Mazi Vyatha

कुणाला सांगू माझी व्यथा?

कुणाला सांगू माझी व्यथा?
कुणाला सांगू माझी व्यथा?
प्राजक्ताच्या प्रासादावर पडली विद्युल्लता
कुणाला सांगू माझी व्यथा?
कुणाला सांगू माझी व्यथा?

प्रलयाचे हे भीषण तांडव
डळमळला गगनाचा मांडव

थरथरत्या पृथ्वीवर नाचे
तिमिरदैत्य एकटा
कुणाला सांगू माझी व्यथा?
कुणाला सांगू माझी व्यथा?

कशास घडल्या आपुल्या भेटी?
कशास जडली वेडी प्रीती?
कशास घडल्या आपुल्या भेटी?
कशास जडली वेडी प्रीती?

मीलन आपुले ठरली
आता स्वप्नामधली कथा
कुणाला सांगू माझी व्यथा?
कुणाला सांगू माझी व्यथा?

कोण निवारील घोर अनर्था?
तूच प्राण, तू जीवन पार्था
कोण निवारील घोर अनर्था?
तूच प्राण, तू जीवन पार्था

ये विझवाया हा दावानल
शिंपाया अमृता
कुणाला सांगू माझी व्यथा?
कुणाला सांगू माझी व्यथा?



Credits
Writer(s): Prabhakar Jog
Lyrics powered by www.musixmatch.com

Link