Priti Priti Saare

प्रीती, प्रीती...
प्रीती, प्रीती सारे म्हणती
प्रीती म्हणजे काय? (काय)
प्रीती म्हणजे काय? (काय)
प्रीती म्हणजे काय? (काय)

दिवस विलक्षण, सुंदर तो क्षण
चाफ्याखाली तुला पाहिली
चाफ्याखाली तुला पाहिली
केस रेशमी, नयन बदामी

हसलीस का तू? हसलो का मी? (का हसलात?)
मनात आले (काय आलं?)
मनात आले काही-बाही
आणि थबकले पाय

पायी हिरवळ, गगनी तारा
युवक समोरी हसरा गोरा
शीळ पुकारित गेला वारा

गोड शिरशिरी उभ्या शरीरी
गोड शिरशिरी उभ्या शरीरी
तना-मनातुन लहर एक ती
वीज चेतवित जाय

नकळत-नकळत जवळी सरलो
तरूवेलीसम का मोहरलो?
लाज लाजे उगा राहिलो
हात मी तुझा हाती, प्रिये, घेतला

हृदयी असा या ठेऊन दिधला
कलकल-कलकल करी अचानक
पक्ष्यांचा समुदाय



Credits
Writer(s): Datta Davjekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link