Tuze Roop Rani

तुझे रूप राणी, कुणासारखे गं?
तुझे रूप राणी, तुझ्यासारखे
तुझे रूप राणी, कुणासारखे गं?

तुझा रेशमी केशसंभार काळा
जणू नागिणीचा दिसे धुंद चाळा

बटा दोन भाळावरी की जिभा त्या
तिच्या मस्तीला कोण रोधू शके?
तुझे रूप राणी, कुणासारखे गं?

तुझे दोन डोळे शराबी-शराबी
हसे लाज गाली गुलाबी-गुलाबी

असे रूपलावण्य मी प्राशितो गे
मला लाभले ते तुला पारखे
तुझे रूप राणी, कुणासारखे गं?

उभी अप्सरा चिंब न्हाऊन येथे
नजर फेकिता रिते बाणभाते

विधाता करी काय हेवा तुझा गे, हेवा तुझा गे
न्याहाळून पाही तुला कौतुके
तुझे रूप राणी, कुणासारखे गं?
तुझे रूप राणी, तुझ्यासारखे
तुझे रूप राणी, कुणासारखे गं?



Credits
Writer(s): Datta Davjekar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link