Ek Haat Tuza

एक हात तुझा, एक हात माझा
एक हात तुझा, एक हात माझा
घागर उचलुन घेते

प्रीत माझी पाण्याला जाते
प्रीत माझी पाण्याला जाते
प्रीत माझी पाण्याला जाते

गव्हाळी वाणाचा हसरा मुखडा
फुलकळी नाकाला नथीचा आकडा
हेरला प्रितीनं गुलजार फाकडा

चोरुनी त्याला भेटाया जाते
चोरुनी त्याला भेटाया जाते
प्रीत माझी पाण्याला जाते

मोहर आंब्याला पहिला आला
मैनेला राघू भेटुनी गेला
लागला पिकांना पाण्याचा लळा

कुहुकुहू गीत कोकिळा गाते
कुहुकुहू गीत कोकिळा गाते
प्रीत माझी पाण्याला जाते

चंद्रकळा, चंद्रकळा काळी
सुगंधी साज, सुगंधी साज
शपथ गळ्याची, शपथ गळ्याची
घेणार आज, घेणार आज

खुदुखुदु गाली हसली लाज बाई
रंगले गुलाबी प्रीतीचे नाते
रंगले गुलाबी प्रीतीचे नाते
प्रीत माझी पाण्याला जाते



Credits
Writer(s): P Savalaram, Dutta Davjekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link