Krishna Gatha

कृष्ण गाथा एक गाणे
जाणते ही वैखरी

एकतारी सूर जाणी
श्री हरी, जय श्री हरी
एकतारी सूर जाणी
श्री हरी, जय श्री हरी

तू सखा, तू पाठीराखा
तूच माझा ईश्वर
राहिलासी व्यापूनीया
तूच माझे अंतर

आळवीते नाम ज्याला
अमृताची माधुरी
एकतारी सूर जाणी
श्री हरी, जय श्री हरी

पाहते मी सर्व ते-ते
कृष्ण रूपी भासते
आणि स्वप्नी माधवाच्या
संगरी मी नाचते

ध्यान रंगी रंगताना
ऐकते मी बासरी
एकतारी सूर जाणी
श्री हरी, जय श्री हरी

तारिलेसी तू कन्हैया
तारिलेसी तू कन्हैया
दीनवाणे, बापुडे
हीन मीरा त्याहूनीही
भाव भोळे-भाबडे

दे सहारा, दे निवारा
या भवाच्या संगरी
एकतारी सूर जाणी
श्री हरी, जय श्री हरी



Credits
Writer(s): Dashrath Pujari, Yashadkumar Galvankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link