Tech Swampna Lochanaat

तेच स्वप्न लोचनांत रोज-रोज अंकुरे
तेच स्वप्न लोचनांत रोज-रोज अंकुरे
पाहतो नभात मी, पाहतो नभात मी
धुंद दोन पाखरे, धुंद दोन पाखरे

शरद चांदण्यातली भेट आठवे मला
गुपित सांगता तुझा अधर मात्र रंगला
शरद चांदण्यातली भेट आठवे मला
गुपित सांगता तुझा अधर मात्र रंगला

रास संपला तरी...
रास संपला तरी भास अंतरी उरे
पाहतो नभात मी, पाहतो नभात मी
धुंद दोन पाखरे, धुंद दोन पाखरे

तू सखे, अजाणता कर करात गुंफिला
तुला-मला तसे बघून गगनी चंद्र लाजला
तू सखे, अजाणता कर करात गुंफिला
तुला-मला तसे बघून गगनी चंद्र लाजला

त्या स्थळी अजून हा...
त्या स्थळी अजून मंद बकुलगंध मोहरे
पाहतो नभात मी, पाहतो नभात मी
धुंद दोन पाखरे, धुंद दोन पाखरे

स्वप्नचूर लोचनांत एक रम्य आकृती
सूर-सूर होत सर्व भावना निनादती
स्वप्नचूर लोचनांत एक रम्य आकृती
सूर-सूर होत सर्व भावना निनादती

वाजतात पायीची...
वाजतात पायीची बघ अजून नूपुरे
पाहतो नभात मी, पाहतो नभात मी
धुंद दोन पाखरे, धुंद दोन पाखरे

तेच स्वप्न लोचनांत रोज-रोज अंकुरे
पाहतो नभात मी, पाहतो नभात मी
धुंद दोन पाखरे, धुंद दोन पाखरे



Credits
Writer(s): Yashwant Deo, Prabhakar Jog
Lyrics powered by www.musixmatch.com

Link