Anta Richya Gudh Garbhi

अंत रीच्या गूढ गर्भी एकदा जे वाटले
एकदा जे वाटले ते, प्रेम आता आटले
सखी प्रेम आता आटले

दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी तू
रंगले आभाळ पूर्वी: तेच आता फाटले
सखी प्रेम आता आटले
सखी प्रेम आता आटले

एकदा ज्यांतून मागे सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले ते, स्नेहतंतू आतले
सखी प्रेम आता आटले
सखी प्रेम आता आटले

शेवटी मंदावलेल्या वादळी वाऱ्या प्रमाणे
वादळी वाऱ्या प्रमाणे
राहणे झाले दिवाणे, राहणे झाले दिवाणे

गीत गाणे कोठले
ते गीत गाणे कोठले
सखी प्रेम आता आटले

अंत रीच्या गूढ गर्भी एकदा जे वाटले
एकदा जे वाटले ते, प्रेम आता आटले
सखी प्रेम आता आटले



Credits
Writer(s): Ram Pathak, N. G. Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link