Santh Wrhrte

संथ वाहते कृष्णामाई
संथ वाहते कृष्णामाई

तीरावरल्या सुख-दुःखांची
तीरावरल्या सुख-दुःखांची
जाणीव तिजला नाही
संथ वाहते कृष्णामाई

कुणी नदीला म्हणती "माता"
कुणी नदीला म्हणती "माता"
कुणी मानिती पूज्य देवता
कुणी मानिती पूज्य देवता

पाषाणाची घडवुन मूर्ती, घडवुन मूर्ती
पूजित कुणी राही
संथ वाहते कृष्णामाई
संथ वाहते कृष्णामाई

सतत वाहते उदंड पाणी, उदंड पाणी
कुणी न वळवुन नेई रानी

आळशास ही व्हावी कैसी?
व्हावी कैसी गंगा फलदायी?

संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुख-दुःखांची
जाणीव तिजला नाही
संथ वाहते कृष्णामाई



Credits
Writer(s): Dutta Daugeker
Lyrics powered by www.musixmatch.com

Link