Pachole Aamhi Pachole

पाचोळे, आम्ही हो पाचोळे
पाचोळे, आम्ही हो पाचोळे
काय कुणासी देऊ?
काय कुणाचे घेऊ?

वणवण भटके वनातले
पाचोळे आम्ही वादळातले
पाचोळे, आम्ही हो पाचोळे
पाचोळे, आम्ही हो पाचोळे

कधी भरारी अथांग गगनी
केव्हा न कळे येतो अवनी

मोहपाश ना आम्हा कुणाचा
स्वैर आम्ही आपुले
मोहपाश ना आम्हा कुणाचा
स्वैर आम्ही आपुले

पाचोळे, आम्ही हो पाचोळे
पाचोळे, आम्ही हो पाचोळे

तरलो त्या प्रक्षुब्ध सागरी
आणि उतरलो दरी-कपारी
तरलो त्या प्रक्षुब्ध सागरी
आणि उतरलो दरी-कपारी

वसुंधरेचे स्वरूप आम्ही
ते ही दुरुन देखिले
वसुंधरेचे स्वरूप आम्ही
ते ही दुरुन देखिले

पाचोळे, आम्ही हो पाचोळे
पाचोळे, आम्ही हो पाचोळे

इतुके आमुचे असुनी काही
वैर कुणाशी कसले नाही

कसेही असो आम्ही मानतो
जीवन आमुचे भले
कसेही असो अम्ही मानतो
जीवन आमुचे भले

पाचोळे, आम्ही हो पाचोळे
पाचोळे, आम्ही हो पाचोळे



Credits
Writer(s): Chitalkar Ramchandra, Anna Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link