Jeevan Aahe Jaganyasathi

लिहिले काही असो ललाटी
जीवन आहे जगण्यासाठी
जीवन आहे जगण्यासाठी

काट्यामधुनी फूलही हसते
काट्यामधुनी फूलही हसते
ढगांत काळ्या वीज चमकते

मातीतून नवविश्व उमलते
केवळ हसण्यासाठी
जीवन आहे जगण्यासाठी
जीवन आहे जगण्यासाठी

आयुष्याच्या ध्येयपथावर
लढती जे दैवाशी खडतर
लढती जे दैवाशी खडतर

देव घालितो विजयश्रीची
माळ तयांच्या कंठी
जीवन आहे जगण्यासाठी
जीवन आहे जगण्यासाठी

शिल्पकार तू तुझ्या कृतीचा
शिल्पकार तू तुझ्या कृतीचा
भाग्यलेख तू लिही स्वत:चा

जगी तुला प्रतिकार कुणाचा?
भाग्य तुझे तंव हाती
जीवन आहे जगण्यासाठी
जीवन आहे जगण्यासाठी



Credits
Writer(s): Madhusudan Kalelkar, Vasant Pawar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link