Tu Manat

तू मनात, तू जगात, तू अनादि, तू क्षणात
तुझे खेळ निरनिराळे, देव तू निरंकार
दुःख-सुख, भूक-तहान तुच दिले या जगात

तुच घडले रूप सारे, तू जगाला तारणार
तुच नाथ, तुच पितृ, तुच बंधु, तू सखा हो
तुच दृष्टी, तुच शृष्टी, तुच धरती, तू आकाश
तुझी माया, तुझी काया, तुच स्वर, तू प्रकाश

तुच वेडा कुंभार, तुच वेडा शिल्पकार
तुच रचितो परमज्ञानी, तुच रचितो आविष्कार

मागू काय मला सांग, तुच दिले मला खूप
मला दिले तुझे रंग आणि दिले तुझे रूप
दे मला तू हीच भिक्षा, नाही राहो काही इच्छा

तुच बीज, तुच फळ, तुच आस, तुच छळ
तुच भाव, तुच ध्याती, तुच शक्ती, तुच भक्ती



Credits
Writer(s): Jeetu Javada, Aslam Hussain Khan, Sunil Harischandra, Aslam Keyi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link