Haravato Sukhacha

हरवतो सुखाचा चेहरा का पुन्हा?
एकटा मी तुझ्या शोधतो का खुणा?
हरवते हातूनी पाहिजे जे मना
जिंकुनी हारते खेळ आहे जुना

साजणा, तुझी याद
जाळी जीवा या पुन्हा
मानत नाही ये जिया
बैरी प्रीत मोहे छोडे ना

शोधतो रस्ता नवा संपतो का असा?
सांगण्याआधी कुणी श्वास संपावा जसा
सरलेल्या क्षणांचे उडून जाती थवे
मी पुन्हा शोधते एकटेपण नवे

दुःख हे एवढा लावते का लळा?
मीच का एकटा सांग ना रे मना?
हरवते हातुनी पाहिजे जे मना
जिंकुनी हारते खेळ आहे जुना

कोसळे आभाळ हे मन तसे वाहते
हे निखारे का असे सुलगती आतले
थकलेल्या जीवाला नीज येईल का?
दुःख या अंतरीचे कोणी जाणेल का?

नेमके हवेसे काय होते असे?
एकटया क्षणांवर सोबतीचे ठसे
हरवते हातुनी पाहिजे जे मना
जिंकुनी हारते खेळ आहे जुना

साजणा, तुझी याद
जाळी जीवा या पुन्हा
मानत नाही ये जिया
बैरी प्रीत मोहे छोडे ना



Credits
Writer(s): Ashwini Shende, Avinash - Vishwajeet
Lyrics powered by www.musixmatch.com

Link