Tujhya Aathvanine Jeev

तुझ्या आठवणीने जीव होतो कासावीस
तुझ्या आठवणीने जीव होतो कासावीस
धरतो मी गावाची वाट
धरतो मी गावाची वाट
पाय होतात डोईजड
पाय होतात डोईजड, डोईजड

तुझ्या आठवणीने जीव होतो कासावीस

धुळीचे रस्ते झाले काळेभोर
माझ्या डोळ्यात नवलाईचे रूप
धुळीचे रस्ते झाले काळेभोर
माझ्या डोळ्यात नवलाईचे रूप

घावाचं शिवार गेलं बदलून
गावाचं शिवार गेलं बदलून
तुझ्या पाउलखुणा भेदतात मन माझे
तुझ्या पाउलखुणा भेदतात मन माझे

तुझ्या आठवणीने जीव होतो कासावीस

तु गेल्याने वीण निसटली
घर आता इथ कोलमडली
तु गेल्याने वीण निसटली
घर आता इथ कोलमडली

कुण्या शेजारी उभा राहतो मी
कुण्या शेजारी उभा राहतो मी
तुझ्या आठवणीने घायाळ मन माझे
तुझ्या आठवणीने घायाळ मन माझे

तुला विचारे इथलेही लोक
गावातील माती पुसे मला खुशाली
तुला विचारे इथलेही लोक
गावातील माती पुसे मला खुशाली

विहीर खोलवरती उपसताना
विहीर खोलवरती उपसताना
आभाळ दाटते काळजात, काळजात
आभाळ दाटते काळजात, काळजात

तुझ्या आठवणीने जीव होतो कासावीस



Credits
Writer(s): Moreshwar Nistane, Shivkumar Aade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link