Swapna Dhunda Bhav Manee

स्वप्न धुंद भाव मनी हसले कसे
स्वप्न धुंद भाव मनी हसले कसे
गीत प्रीतीचे बहरूनी आले
गीत प्रीतीचे बहरूनी आले

सूर-सूर अंतरीचे जुळले असे
सूर-सूर अंतरीचे जुळले असे
गीत प्रीतीचे बहरूनी आले
गीत प्रीतीचे बहरूनी आले

जागले फुल कोशातले
लाभले चित्र भासातले
कशी सांगू तुला गुज ओठातले?
कशी सांगू तुला गुज ओठातले?

गुंफले गंध श्वासातले
हो, रंगले ऋतू प्राणातले
या सुखाच्या क्षणी विश्व भारावले
या सुखाच्या क्षणी विश्व भारावले

मूर्त तुझी ध्यानी, मनी, स्वप्नी वसे
मूर्त तुझी ध्यानी, मनी, स्वप्नी वसे
गीत प्रीतीचे बहरूनी आले
गीत प्रीतीचे बहरूनी आले

झुलवू झुला आनंदाचा
सजवू साज संसाराचा
प्रीतीची बासुरी दरवळे अंतरी
प्रीतीची बासुरी दरवळे अंतरी

हो, फुलवू स्वप्न ते वादळी
नटवू स्वर्ग या भूतली
साथ ही राहू दे जन्म-जन्मांतरी
साथ ही राहू दे जन्म-जन्मांतरी

रंग-रंग जीवनात फुलले असे
रंग-रंग जीवनात फुलले असे
गीत प्रीतीचे बहरूनी आले
गीत प्रीतीचे बहरूनी आले

स्वप्न धुंद भाव मनी हसले कसे
सूर-सूर अंतरीचे जुळले असे
गीत प्रीतीचे बहरूनी आले
गीत प्रीतीचे बहरूनी आले

गीत प्रीतीचे बहरूनी आले
गीत प्रीतीचे बहरूनी आले



Credits
Writer(s): Anil, Arun, Vandana Vitnkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link