Samaichya Shubhra Kalya

समईच्या शुभ्र कळ्या...
समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायाशी पडते
समईच्या शुभ्र कळ्या...

भिवयांच्या फडफडी दिठीच्याही मागे-पुढे
भिवयांच्या फडफडी दिठीच्याही मागे-पुढे

मागे-मागे राहिलेले माझे माहेर बापुडे
समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते
समईच्या शुभ्र कळ्या...

साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची
साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची

आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची
समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते
समईच्या शुभ्र कळ्या...

थोडी फुले माळून ये, डोळा पाणी लावून ये
थोडी फुले माळून ये, डोळा पाणी लावून ये

पदराच्या किनारीला शिवू-शिवू ऊन गं ये
समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते
समईच्या शुभ्र कळ्या...

हासशील हास मला, मला हासू ही सोसेना
हासशील हास मला, मला हासू ही सोसेना

अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा?
समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायाशी पडते
समईच्या शुभ्र कळ्या...



Credits
Writer(s): Asha Bhosle, Aarti Prabhu
Lyrics powered by www.musixmatch.com

Link