Madhu Magasi Mazya

मधू मागसी माझ्या सख्यापरी
मधुघटची रिकामे पडती घरी
मधू मागसी माझ्या सख्यापरी

आजवरी कमळाच्या द्रोणी
मधू पाजिला तुला भरोनी
आजवरी कमळाच्या द्रोणी
मधू पाजिला तुला भरोनी

सेवा ही पुर्विची स्मरोनी
सेवा ही पुर्विची स्मरोनी
करी न रोष, सख्या, दया करी
मधू मागसी माझ्या सख्यापरी

नैवेद्याची एकच वाटी
आता दुधाची माझ्या गाठी
नैवेद्याची एकच वाटी
आता दुधाची माझ्या गाठी

देवपुजेस्तव ही कोराटी
देवपुजेस्तव ही कोराटी
बाळगी अंगणी कशी तरी
मधू मागसी माझ्या सख्यापरी

तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज
वृक्षझऱ्यांचे गूढ मधुर गुज
तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज
वृक्षझऱ्यांचे गूढ मधुर गुज

संसाराचे मर्म हवे तुज
संसाराचे मर्म हवे तुज
मधू पिळण्यापरी बळ न करी
मधू मागसी माझ्या सख्यापरी

ढळला रे, ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविती हृदया
ढळला रे, ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविती हृदया

आता मधूचे नाव कासया?
आता मधूचे नाव कासया?
लागले नेत्र रे पैलतीरी

मधू मागसी माझ्या सख्यापरी
मधुघटची रिकामे पडती घरी
मधू मागसी माझ्या सख्यापरी



Credits
Writer(s): Vasant Prabhu, Kavi B.r. Tambe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link