Anolkhi (From "Smile Please")

ना कळे कसला प्रवास हा?
का छळे शंका मनास ह्या?

सारे विसरून ही
आठवते हेच की
सुटले काहीतरी, केव्हातरी

जगताना श्वास ही का भासतो परका अनोळखी
बघताना आरसा चेहरा कसा दिसतो अनोळखी

ना कळे कसला प्रवास हा?
का छळे शंका मनास ह्या?

सैल होत चालली का नात्यांची वीण ही?
पैलतीर सापडेना लाटांशी भांडुनी
भवताली फिरे सारे गोल
तोल जातो कसा खोल खोल?
रूसलेले जगणे केव्हातरी

चुकताना वाट ही तुटतो जसा तारा अनोळखी
निसटे हातातुनी वाळू तसे क्षण हे अनोळखी

हो ना कळे शोधू कुठली दिशा?
का छळे फसवा सवाल हा?

सारे विसरून ही
आठवते हेच की
सुटले काहीतरी केव्हातरी

जगताना श्वास ही का भासतो परका अनोळखी
बघताना आरसा चेहरा कसा दिसतो अनोळखी

ना कळे!



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Rohan Gokhale, Rohan Anil Pradhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link