Antaricha

अंतरीचा सूर हलकेच असा उमटला
जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला
अंतरीचा सूर हलकेच असा उमटला
जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला

मन वेडे होई तुझियासाठी आस सरेना ही
अलवार देना साद या मना सखे बोल काही
गंध ओला दूर वाऱ्यावर कसा हरवला?
जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला

हरवल्या जीवा आज कसे सांगावे?
रेशमी जरी घाव किती सोसावे?
स्वप्न साजरे आहे अजुनी जपलेले
शिंपल्यातुनी मोती ओले सजलेले

या वाटांवरती दिसती अजूनही का खुणा सरल्या
आभास हे का होती अजुनी सावल्या उरल्या
श्वास माझा नकळत तुझ्यातच गुंतला
जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला

साथी, ना जिया मैं तेरे बिना
माहिया, ना जिया तेरे बिना
माहिया, तू है कहाँ माहिया?

साथी, ना जिया मैं तेरे बिना
साथी, ना जिया मैं तेरे बिना
माहिया, तू है कहाँ माहिया?

जियूँ ना, जियूँ ना तेरे बिना मैं माहिया
जियूँ ना, जियूँ ना तेरे बिना साथिया

शब्द थांबले मौनातच कळले सारे
चांदणे नवे धुंदीतच हळवे तारे
आज वाटते चल पार नभाच्या जाऊ
ह्या मिठितुनी हे स्वप्न नवेसे पाहू

हे हसणे-रुसणे धुंद नशा ही जग माझे खुलले
हे भास गुलाबी लहर ही नवी मनात चुरलेले
चिंब मी-तू घण आज एका-एक बरसला
जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला

अंतरीचा सूर हलकेच असा...
जीव माझा अलगद तुझ्यासवे...
अंतरीचा...
जीव माझा...



Credits
Writer(s): Vishal Mishra, Spruha Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link