Ya Jeevan Aaple Sarth Kara Re

या जीवन आपले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निःस्वार्थ करा रे
एकजुटीने कार्य करा या देशाचे
या साथी बना अन सार्थ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे
जागृत होऊन कंकण बांधू दिवसरात्र जगण्याचे

मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणांचे
फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे
घेऊ हे ब्रीद हाती आसेतुसिंधू नव हिंदुस्तानाचे

भीती न आम्हा ह्या वज्र मुठींनी कातळ भेदू
सीमा न कुठली, हुंकार असा गगनाला छेदू

हो, भीती न आम्हा ह्या वज्र मुठींनी कातळ भेदू
सीमा न कुठली, हुंकार असा गगनाला छेदू
ठाम निश्चय हा दुर्दम्य आमुची इच्छाशक्ती
हृदय पोलादी, ना सोडी कधी राष्ट्रभक्ती

मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणांचे
फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे
घेऊ हे ब्रीद हाती आसेतुसिंधू नव हिंदुस्तानाचे

जन्म हा माझा होई सार्थ साचा, मुक्त माता होता
हे एकची माझे ध्येय आता राष्ट्र असे घडवावे
हे भारतभू तुजसाठी अविरत आजीवन अर्पावे

ज्योत ज्ञानाची स्फुल्लिंग मनाचे पेटून उठले
स्वाभिमानाचे हे कुंड मनाचे मग धगधगले
शृंखला तोडी हे दास्य आता ना साही कोणा
देश हा अमुचा, स्वातंत्र्याचा अमुचा बाणा

मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणांचे
फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे
घेऊ हे ब्रीद हाती आसेतुसिंधू नव हिंदुस्तानाचे

(नव हिंदुस्तानाचे)



Credits
Writer(s): Ajit Sameer, Shrirang Godbole
Lyrics powered by www.musixmatch.com

Link