Mann Hey Khule Kase

मन हे खुळे कसे रे, गगनी पाखरू जसे
...गगनी पाखरू जसे

गंध वारा बिलगताना...
गंध वारा बिलगताना त्यास भुलते कसे
मन हे खुळे कसे रे, गगनी पाखरू जसे
...गगनी पाखरू जसे

आकाशाची गहन निळाई
आकाशाची गहन निळाई
तशी कुणाची ओळख होई
आकाशाची गहन निळाई
तशी कुणाची ओळख होई

एक अनामिक हुरहुर लावी...
एक अनामिक हुरहुर लावी जन्मभरीचे पिसे
मन हे खुळे कसे रे, गगनी पाखरू जसे
...गगनी पाखरू जसे

मेघाआडुन कुणी बोलवी
मेघाआडुन कुणी बोलवी
अमृतजादू करून दाखवी
मेघाआडुन कुणी बोलवी
अमृतजादू करून दाखवी

व्याकुळतेच्या भाळी केवळ...
व्याकुळतेच्या भाळी केवळ पाण्याचे आरसे
मन हे खुळे कसे रे, गगनी पाखरू जसे
...गगनी पाखरू जसे

ऋतू फुलांच्या गावी येई
ऋतू फुलांच्या गावी येई
भ्रमर मिठीचे गाणे गाई
भ्रमर मिठीचे गाणे गाई

माळावरती आता सुरांचे...
माळावरती आता सुरांचे उदासवाणे ठसे
मन हे खुळे कसे रे, गगनी पाखरू जसे
...गगनी पाखरू जसे

गंध वारा बिलगताना...
गंध वारा बिलगताना त्यास भुलते कसे
मन हे खुळे कसे रे, गगनी पाखरू जसे

...गगनी पाखरू जसे
पाखरू जसे, पाखरू जसे



Credits
Writer(s): Yashwant Deo
Lyrics powered by www.musixmatch.com

Link