Lavthavti Vikrala Shiv Aarti - Studio

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकी बाळा
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळा

जय देव, जय देव, जय श्रीशंकरा
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा
जय देव, जय देव

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा
अर्धांगी पार्वती, सुमनांच्या माळा
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा

जय देव, जय देव, जय श्रीशंकरा
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा
जय देव, जय देव

देवि दैत्य सागरमंथन पै केले
त्यामाजीं अवचित हळहळ जे उठले
ते त्वां असुरपणे प्राशन केले
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले

जय देव, जय देव, जय श्रीशंकरा
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा
जय देव, जय देव



Credits
Writer(s): Aditya Paudwal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link