Jay Shri Mangesha Sarvesha

जय देव, जय देव, जय श्री मंगेशा
पंचारति ओवाळू सदया सर्वेशा
जय देव, जय देव

सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी
गौरीरमणा आद्या मदनांतकारी
त्रिपुरारी अधहारी शिवमस्तकधारी
विश्वंभर विरुदे है मम संकट वारी

जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय श्री मंगेशा
पंचारति ओवाळू सदया सर्वेशा
जय देव, जय देव

भयकृत भयनाशन ही नामें तुज देवा
विबुधादिक कमळासन वांछिती तव सेवा
तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा
अभिनव कृपाकटाक्षे मतिउत्सव द्यावा

जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय श्री मंगेशा
पंचारति ओवाळू सदया सर्वेशा
जय देव, जय देव

शिव शिव जपता, शिव तू करिसी निजदासा
संकट वारी मम तू करी शत्रुविनाशा
कुळवृद्धीते पाववी हीच असे आशा
अनंतसुत वांछितसे चरणांबुजलेशा

जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय श्री मंगेशा
पंचारति ओवाळू सदया सर्वेशा
जय देव, जय देव



Credits
Writer(s): Prabhakar Rege
Lyrics powered by www.musixmatch.com

Link