Ashich Saath Rahu De

अशीच साथ राहू दे फुलास सौरभाची
अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची, प्रसन्न चांदण्याची
अशीच साथ राहू दे फुलास सौरभाची
अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची, प्रसन्न चांदण्याची

अश्या युगात लाभल्या, सुखावल्या क्षणात
मिटुन लोचने तुला मिठीत सावरीत
अश्या युगात लाभल्या, सुखावल्या क्षणात
मिटुन लोचने तुला मिठीत सावरीत

तार छेडिता स्वरात रास चुंबनांची
अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची, प्रसन्न चांदण्याची

स्पर्श-स्पर्श वेचिते तुझाच चंदनाचा
मोहरे मनात गंध प्रीत बंधनाचा
स्पर्श-स्पर्श वेचिते तुझाच चंदनाचा
मोहरे मनात गंध प्रीत बंधनाचा

मी जपून ठेवते स्मृती अशा सुखाची
अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची, प्रसन्न चांदण्याची

यापुढे कधीच दूर जाऊ तू नकोस
घे मिटुन काळजात या मुक्या कळीस
यापुढे कधीच दूर जाऊ तू नकोस
घे मिटुन काळजात या मुक्या कळीस

ही ऋणानुबंधने अशी युगा-युगांची
अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची, प्रसन्न चांदण्याची
अशीच साथ राहू दे फुलास सौरभाची
अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची, प्रसन्न चांदण्याची



Credits
Writer(s): Arun Paudwal, Santaram Nandgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link